एकमेकांचे कट्टर विरोधक विजय औटी आणि निलेश लंके आले एकत्र. ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. या नेत्यांमधील राजकीय वादामुळे पारनेरमध्ये महाविकास आघाडीचे चित्र हे अस्पष्ट होते. पण विजय औटी आणि निलेश लंके यांची दिलजमाई झाली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी भाजपविरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. एकीकाळी दोघे शिवसेनेत होते. परंतु विधानसभा निवडणुकी अगोदर लंके व औटी यांच्यात वाद झाला. त्यातून लंके हे राष्ट्रवादीत गेले आणि आमदार झाले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. तो पारनेर नगरपालिकेत दिसून आला आहे. परंतु पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस, ठाकरे गटाचे औटी, भाजपचा असे तीन पॅनेल होण्याची शक्यता होती. तशी तयारी सुरू होती. पण अखेर पारनेरमध्ये महाविकास आघाडी घडून आलेली आहे. राष्ट्रवादीला आठ, काँग्रेसला पाच, ठाकरे गटाला पाच जागा देण्याचे निश्चित झाले. तर दोन्ही पक्षाचे वरिष्ठ ...