आज शिवसेनेच्या प्रवक्ते पदी संभाजीनगरचे आमदार श्री संजय शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पत्र त्यांना मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले आहे. तरी त्यांचा पुढील वाटचालीस आणि पक्ष वाढीस मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल युवा उद्योजक पै.मनोज शेठ गर्जे त्यांचे कट्टर समर्थक श्री.साईनाथ जी पालवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.