Skip to main content

Posts

Showing posts with the label अहमदनगरचे आ. प्राजक्त तनपुरे आणि आ. संग्राम जगताप यांच्या नावाचे

अहमदनगरचे आ. प्राजक्त तनपुरे आणि आ. संग्राम जगताप यांच्या नावाचे बनावट शिक्के, लेटर पॅड दोघे पोलिसांनी ताब्यात घेतले..

 अहमदनगरचे आ. प्राजक्त तनपुरे आणि आ. संग्राम जगताप यांच्या नावाचे बनावट शिक्के, लेटर पॅड दोघे पोलिसांनी ताब्यात घेतले.     आज अहमदनगर येथील आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचे बनावट शिक्के, लेटर पॅड, आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, मनपाच्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या शिक्क्यांचा परस्पर वापर करणार्‍या गुलमोहर रोडवरील एका आधारकार्ड दुरूस्ती केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी सोमवारी 17 एप्रिल 2023 रोजी छापा टाकून त्यांचा कडील सर्व साहित्य ताब्यात घेतले गेले आहे.          याप्रकरणी दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांची नावे हारूण हबीब शेख (वय 31 रा. वरवंडी, ता. राहुरी) व दादा गोवर्धन काळे (वय 35 रा. निंबोडी, ता. नगर) अशी त्यांची ओळख आहे. अहमदनगर मधील सावेडी गावातील भारत संचार निगम लिमिटेड(BSNL) कार्यालयाजवळील गाळ्यामध्ये सक्सेस मल्टीसर्व्हिस आधार कार्ड दुरूस्तीचे केंद्र याठिकाणी आहे. या ठिकाणी सर्व बनावट कागदपत्र तयार केले जात होते. ही माहिती खबर्‍याकडून तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे ...