Skip to main content

Posts

Showing posts with the label आमरण उपोषण

दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहीफळ सबस्टेशन मधून शेतीसाठी वीज पुरवठा द्या :-हरीश जायभाये

दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहीफळ सबस्टेशन मधून शेतीसाठी वीज पुरवठा द्या :-हरीश जायभाये.       दहिफळ ग्रामस्थांनी उपअभियंता कार्यालयास निवेदन दिले आहे. अन्यथा लाक्षणिक उपोषण केले जाईल असे सांगितले आहे.          शेवगाव तालुक्यातील दहिफळ जुने येथील सामाजिक कार्यकर्ते हरीश जायभाये, बबलू व्यवहारे व समस्त ग्रामस्थांनी नुकतेच दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहिफळ सबस्टेशन मधून शेतीला वीज पुरवठा मिळणेबाबतचे निवेदन उपअभियंता साहेब म.रा.वि.वि. यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या अस्मानी संकट व सतत खंडित वीज प्रवाह यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. तसेच वादळ वारा गारपीट व सतत खंडित वीज प्रवाह यामुळे शेती व्यवसाय हा फायद्याचा राहिला नसून तो संपूर्ण तोट्याचा झाला आहे. शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हा फायद्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्ष व सरकार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे परंतु तसे काही परिणाम प्रत्यक्षात दिसून येत नाहीत. फक्त शेतकरी नावापुरता शेतकरी राजा शिल्लक राहिला आहे.           दहिफळ गावासाठी दहिफळ...