अहमदनगर जिल्ह्यात चाललंय तरी काय ? लव्ह जिहाद प्रकरण चांगलेच तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. स्थानिक नागरिकांनी अल्पवयीन मुलगी आणि तिला पळून नेणारा तरुण या दोघांना पकडून पोलिसाच्या हवाली केले आहे. याप्रकरणी सदर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अमन सलीम मोमीन यांचा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन सलीम मोमीन हा राहणार मोमिपुरा, तालूका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील आहे. या तरुणाविरुद्ध अपहरण आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील रविवारी संगमनेर तालुक्यातल्या गंगामाई घाटावर एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. हा प्रकार ‘लव जिहाद’चा असल्याचा संशय नागरिकांना आला होता. लगेच तेथील स्थानिक नागरिकांनी त्या दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. विशेष म्हणजे अमन मोमीन या तरुणाने त्या मुलीच्या वडिलांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सदर मुलीला पटवले आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते, असे सांगण्यात आले आहे. ...