दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहीफळ सबस्टेशन मधून शेतीसाठी वीज पुरवठा द्या :-हरीश जायभाये.
दहिफळ ग्रामस्थांनी उपअभियंता कार्यालयास निवेदन दिले आहे. अन्यथा लाक्षणिक उपोषण केले जाईल असे सांगितले आहे.
शेवगाव तालुक्यातील दहिफळ जुने येथील सामाजिक कार्यकर्ते हरीश जायभाये, बबलू व्यवहारे व समस्त ग्रामस्थांनी नुकतेच दहिफळ जुने गावातील सर्व शेतकऱ्यांना दहिफळ सबस्टेशन मधून शेतीला वीज पुरवठा मिळणेबाबतचे निवेदन उपअभियंता साहेब म.रा.वि.वि. यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या अस्मानी संकट व सतत खंडित वीज प्रवाह यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. तसेच वादळ वारा गारपीट व सतत खंडित वीज प्रवाह यामुळे शेती व्यवसाय हा फायद्याचा राहिला नसून तो संपूर्ण तोट्याचा झाला आहे. शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हा फायद्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्ष व सरकार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे परंतु तसे काही परिणाम प्रत्यक्षात दिसून येत नाहीत. फक्त शेतकरी नावापुरता शेतकरी राजा शिल्लक राहिला आहे.
दहिफळ गावासाठी दहिफळ येथे सबस्टेशन करण्यात आले असून त्याचा संपूर्ण फायदा हा दहिफळच्या शेतकऱ्यांना होणे क्रम प्राप्त आहे परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व संतोष निर्माण झालेला आहे. त्या असंतोषाच्या प्रचंड उद्रेक होऊ शकतो तो उद्रेक होऊ नये व शांतता कायम राहावी म्हणून दहिफळ सबस्टेशनमधून संपूर्ण दहीफळ गावच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज प्रवाह मिळावा कारण घोटन सबस्टेशन मधील यंत्रणा खूप जुनी झालेली असून तेथे सतत बिघाड होत असून सतत वीज प्रवाह खंडित होत असतो व परिणामी चांगले आलेले पीक वाया जाऊ खूप मोठी आर्थिक हानी शेतकऱ्यांची होत असते हे सततचे नुकसान होऊ नये म्हणून स्थानिक सर्व शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दहिफळ स्टेशन मध्ये ॲडिशनल 5 एम.व्ही.ए अजून एक ट्रांसफार्मर बसवण्यात यावा किंवा घोटन सब स्टेशन मधून असणारा दहिफळ गावातील काही भागातील शेतीचा वीज प्रवाह हा बंद करून दहिफळ सब स्टेशन मधून जोडण्यात यावा. या दोन्हीपैकी कोणतीही एक व्यवस्था प्रशासनाने त्यांच्या स्तरावर करावी अन्यथा शेवगाव उपविभागीय कार्यालयासमोर प्रथम एक दिवसाचे लक्षणे व त्यानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.यासाठी आंदोलन उपोषण अथवा आत्मदहन करण्याची तयारीही शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे. निवेदनात गोकुळ व्यवहारे, शिंदे राजेंद्र, मुऱ्हाडे बाळू, दत्तू माळी, आसिफभाई पठाण तसेच समस्त ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
दहिफळ येथील शेतकऱ्यांना घोटण सब स्टेशन येथून वीज पुरवठा होत आलेला आहे परंतु घोटण सबस्टेशन हे अतिशय जुने असल्यामुळे त्या ठिकाणाहून येणाऱ्या वीज प्रवाहात नेहमीच काही ना काही अडथळा येत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्हाला लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून शेवगाव उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक व त्यानंतर आमरण उपोषण करणार आहेत. - हरीश जायभाये (सामाजिक कार्यकर्ता).....Read more

Comments
Post a Comment