अहमदनगर जिल्ह्यात चाललंय तरी काय ? लव्ह जिहाद प्रकरण चांगलेच तापले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. स्थानिक नागरिकांनी अल्पवयीन मुलगी आणि तिला पळून नेणारा तरुण या दोघांना पकडून पोलिसाच्या हवाली केले आहे. याप्रकरणी सदर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अमन सलीम मोमीन यांचा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन सलीम मोमीन हा राहणार मोमिपुरा, तालूका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील आहे. या तरुणाविरुद्ध अपहरण आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील रविवारी संगमनेर तालुक्यातल्या गंगामाई घाटावर एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. हा प्रकार ‘लव जिहाद’चा असल्याचा संशय नागरिकांना आला होता. लगेच तेथील स्थानिक नागरिकांनी त्या दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. विशेष म्हणजे अमन मोमीन या तरुणाने त्या मुलीच्या वडिलांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सदर मुलीला पटवले आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते, असे सांगण्यात आले आहे.
सदर मुलीच्या वडिलांचे इंस्टाग्राम ॲपवर अकाउंट आहे. त्या अकाउंटवर अमन याने त्या मुलीला मेसेज केला आणि संगमनेरच्या बसस्थानकावर बोलवून घेतले. नागरिकांनी या दोघांना पाहिल्यानंतर पोलिसांना या प्रकाराची ताबडतोब कल्पना दिली. पोलिसांनी सदर मुलीच्या आई-वडिलांना बोलवून त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल केला गेला.
आपली मुलगी कुठे जाते, घरी कधी येते, काय करते, मोबाईलवर किती वेळ चॅटिंग करते, कॉलेजच्या नावाखाली किती वेळ घराबाहेर असते, याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे असे पोलिस यांचा कडून सांगण्यात आले. अलीकडच्या काळात ‘लव जिहाद’चे प्रकार वाढत आहेत. अल्पवयीन मुलींना सामाजिक भान नसतं, त्यांच्या भावनेचा गैरवापर करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं. हे प्रकार होऊ नये, यासाठी पालक वर्ग केव्हा अलर्ट होणार, हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या पाल्यावर त्यांचा आई आणि वडील यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सदर प्रकार मुलींनी आणि मुलांनी टाळण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या जन्मदात्या आई वडीलांचे समाजामध्ये नाव खराब होते. याचे भान ठेवणे नवीन पिढीने गरजेचे आहे.
त्यामुळे आपल्या आई वडिलांना समाजामध्ये मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नये असा संदेश यामार्फत घेणे गरजेचे आहे......Read more

Comments
Post a Comment