युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!
विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.
हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. अशा प्रकारचे तरुण नेतृत्व गावोगावी भेटले तर महाराष्ट्राचा पर्यायाने देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही यात काहीही शंका नाही.
येणाऱ्या काळात नाना प्रकारचे विकास कामे करू व मसोबा वाडी ग्रामपंचायतीचे नाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर गाजू असे शिवा शेकडे यांनी सांगितले......Read more.
Comments
Post a Comment