नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.
नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.
सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कोल्हार चे सरपंच राजू नेटके ,उपसरपंच मेजर गोरक्षनाथ पालवे ,मच्छिंद्र पालवे, बाळासाहेब पालवे , शर्माजी पालवे ,संदीप पालवे ,गौरव गर्जे ,दिनकर पालवे ,आकाश पालवे ,प्रा. प्रेमकुमार पालवे, मेजर शिवाजी पालवे ,मेजर शिवाजी गरजे ,मदन शेट पालवे एडवोकेट पोपटराव पालवे, ऍडव्होकेट संदीप जावळे इत्यादी उपस्थित होते.ऍडव्होकेट भागवतराव शिरसाठ यांचे चिरंजीव सचिन शिरसाठ हे जालना येथील न्यायालयात न्यायाधीश आहेत तर शिवाजी शिरसाठ नेवासा कोर्टात ऍडव्होकेट म्हणून काम पाहतात.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रेमकुमार पालवे यांनी केले तर आभार ऍडवोकेट श्री.शिवाजी शिरसाठ यांनी मानले.....Read more
Comments
Post a Comment