छत्रपती शिवराय केसरी, वाडिया पार्क, अ. नगर अर्धा किलो सोन्याची गदा #फायनल #विजेता पहिलवान पै. श्री. महेंद्र गायकवाड
छत्रपती शिवराय केसरी, वाडिया पार्क, अहमदनगर
अर्धा किलो सोन्याची गदा #फायनल #विजेता पहिलवान
#पै. श्री. महेंद्र गायकवाड (#सोलापूर)
अहमदनगर शहरात तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा २० ते २३ एप्रिल रोजी नगर शहरातील वाडियापार्क मैदानावर संपन्न झाली आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्ष व अहमदनगर जिल्हा तालीम संघा मार्फत कुस्त्यांचा थरार रंगला होता.
या स्पर्धेची फायनल कुस्ती महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात रंगली होती. या कुस्तीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या कुस्तीची सुरुवात करण्यात आली. लढत चालू असताना शिवराज राक्षे जखमी झाल्या असल्याकारणाने महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले. या लढतीमध्ये महेंद्र गायकवाड ने शिवराज राक्षेवर विजय मिळवत तब्बल 35 लाख रुपये किमतीची अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस म्हणून मिळवली आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या मल्लास हॉलमार्क असलेली २४ कॅरेटची अर्धा किलो सोन्याची गदा (किंमत सुमारे ३५ लाख) जीएसटीच्या बिलासह बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे....Read more
Comments
Post a Comment