अहमदनगर जिल्हा परिषदेत लवकरच मोठी पदभरती.
अहमदनगर:-
यानुसार आता अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत जवळपास एक हजाराहून अधिक रिक्त पदे असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेतील विविध विभागातील ही एकच राहून अधिक रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण १८ हजार ९३९ पदे भरली जाणार आहेत.
आनंदाची बातमी; जिल्हा परिषदेत एक हजाराहून अधिक रिक्त पदांसाठी भरती होणार, वाचा सविस्तर
अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषदेत लवकरच मोठी पदभरती आयोजित होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील पदभरती मार्गी लागणार असल्याचे आहे.
ही परीक्षा मात्र आयबीपीएस या कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. दरम्यान आता या कंपनीने एप्लीकेशन पोर्टल विकसित करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लवकरच ही पदभरती होणार असल्याचे चित्र आहे. आता आपण नेमक्या कोणत्या रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.
मेडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या पदभरतीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा परिषदे अंतर्गत कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका महिला, विस्तार अधिकारी कृषी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी इत्यादी १८ संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे. निश्चितच ही पदभरती इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणार आहे......Read more

Comments
Post a Comment