धनराज गुट्टे वंजारी समाजाचा हिरा आहे- डॉ.तात्याराव लहाने.
यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे धनराज गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने तात्याराव लहाने यांनी धनराज यांच्याबद्दलची कामाचे कौतुक केले आहे. सूर्य गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर समाजाचे काम करणारा जो कोणी युवा नेता असेल तर तो धनराज गुट्टे आहे असे गौरवोद्गार जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री.प्रविण जी. दराडे साहेब हे उपस्थित होते. दराडे साहेब मोठे भाऊ म्हणून कायम पाठीशी उभे राहत असतात.
यावेळी दराडे साहेब यांनी धनराज गुट्टे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दराडे साहेब यांनी सांगितले धनराज गुट्टे यांना कधीही कॉल करा. कधीही प्रवासात असतो. समाजाच्या कामात धनराज ने स्वतःला झोकून दिले आहे. अनेक माणसे पहिले पण धनराज सारखा आणि धनराज च्या कामाची पद्धत असणारा माणूस मी अजून पाहिला नाही.
सेवानिवृत्त जिल्हाधिकारी श्री.गुट्टे साहेब धनराज जी बद्दल कामाच्या पद्धती समजावून सांगितल्या. धनराज वंजारी समाजाचा राजा माणूस आहे. यावेळी मुंबई येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व समाज बांधव उपस्थित होते. त्यांना असेच सामाजिक काम करण्याची स्पूर्ती आणि समाज बांधवांनी साथ दिली पाहिजे.
तसेच आज पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्जुन चेमटे यांनी केले. उत्कृष्ट रित्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्जुन चेमटे यांनी केले आहे.....Read more
Comments
Post a Comment