अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध आगडगाव यात्रेची मानाची गदा पैलवान सौरभ मराठे यांनी पटकावली......
नगर तालुक्यातील आगडगाव येथील सुप्रसिद्ध कुस्ती आखाड्याची मानाची 2023 ची गदा मराठवाडी येथील बुर्हानगर तालमीतील पैलवान सौरभ मराठे यांनी जिंकली आहे.
काळभैरवनाथ देवस्थान आगडगावचे अध्यक्ष श्री.बलभीम कराळे व सर्व ट्रस्टींच्या हस्ते ही मानाची गदा देण्यात आली. त्यासोबत 13000रुपयांचे रोख बक्षीस ही देण्यात आले आहे.
सौरभ हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून कुस्तीचा सराव करत असतो. या यशाबद्दल त्याचे अनेक मान्यवरांकडून कौतुक केले जात आहे. राज्याचे माजी मंत्री मा.श्री शिवाजीराव कर्डिले, वस्ताद सोमनाथ राऊत, पै.विशाल आढाव,सरपंच श्री.मोहन मराठे, शिवाजी कराळे, मच्छिंद्र कराळे, म्हातारदेव मराठे,ज्ञानेश्वर मराठे, भास्कर मराठे, बाळासाहेब मराठे,शुभम मराठे, यांनी सर्वांनी सौरभ ला अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
पै. सौरभ मराठे याने चितपट कुस्ती करून आगडगावची येथील काळ भैरवनाथ केसरी ची मानाची गदा पटकावली, 17 एप्रिल 2023

Congratulations 🎉🎉
ReplyDelete