मराठा उद्योजक विकास संस्थेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अनिकेत आवारे.
अहमदनगर :
मराठा उद्योजक विकास संस्थेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र अनिकेत आवारे यांना प्रदान करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देताना प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, संजय वायाळ, तानाजीराजे जाधव, सुधाकर पाटील, भागचंद झांजे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठा उद्योजक विकास संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिकेत आवारे २१ एप्रिल २०२३ रोजी मराठा उद्योजक महा अधिवेशनामध्ये मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील यांनी अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी अहमदनगरचे युवा उद्योजक अनिकेत आवारे यांची निवड केली आहे. उपाध्यक्षपदी अक्षय तोडमल, कार्याध्यक्ष म्हणून नामदेव तांबे, सचिव दिलीप कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
या महाअधिवेशनात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, अतिरिक्त सचिव डॉ. सचिन भदाने, इंजि. विजय घोगरे, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सिंह पाटील, डॉ. सुरेश हावरे, जगदीश कदम, प्रकाश भोसले, हनुमंतराव गायकवाड, संजय वायाळ, उज्ज्वल साठे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच राज्य समन्वयक सुधाकर पाटील, प्रवक्ते भागचंद झांजे, तानाजी राजे जाधव महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. नाशिक येथील महाअधिवेशन नाशिकचे जिल्हाध्यक्ष विशाल देसले यांनी परिश्रम घेतले.
या वेळी उद्योजिका स्वाती जाधव, संपूर्णा सावंत, रोहिणी खिळे, सुवर्णा गिर्हे, उद्योजक संजय तोडमल, निरंजन कराळे, जय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते....Read more

Comments
Post a Comment