शिर्डीमधून लोकसभा लढवायची आहे, रामदास आठवले यांचा फडणवीस, विखेंना प्रस्ताव...
अहमदनगर उत्तर विभाग:-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले सध्या केंद्रात सामाजिक न्याय मंत्री आहेत. राज्यसभेत खासदार असणारे रामदास आठवले यांची खासदारकीची मुदत २०२६मध्ये संपणार आहे. त्यामुळे अजून पुढील तीन वर्षं राज्यसभेचे खासदार असनार आहेत. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याच 'जनसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामदास आठवलेंनी महाराष्ट्रातील शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात केंद्रातील भाजपा नेत्यांशी ही देखील चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
त्यांनी सांगितले की, आता मी दुसऱ्यांदा राज्यसभेत आलो आहे. सध्या 2026 पर्यंत मी खासदार असनार आहे. पण माझी एकदा शिर्डीतून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. आणि मला तशी संधी मिळाली, तर मी शिर्डीतून निवडणूक लढवेन असे ही ते बोलले आहेत. मी सध्या लोकसभेचा माणूस आहे. बघुयात आता काय होतंय पुढे असे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना मी प्रस्ताव देखील या अगोदर दिलेला आहे. पण अजून या संदर्भात केंद्रातील नेत्यांशी मी आणखी बोललेलो नाही. मला एकदा संधी मिळाली तर मी तिथून जिंकून येऊ शकतो", असंही रामदास आठवले म्हणाले. लवकरच या बाबत मी केंद्रातील नेत्यांशी ही बोलणार आहे असे ही ते बोलले आहेत....Read more

Comments
Post a Comment