माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हेच ठरले पुन्हा एकदा किंग मेकर...
अहमदनगर:-
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते तथा अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने सलग चौथ्यांदा विजय मिळवत बाजार समितीची सत्ता कायम राखली.
१८ पैकी १८ जागांवर कर्डिले कोतकर गटाने विजय मिळवला असून त्यांच्या मागील निवडणुकीचा मता पेक्षा यावेळी मताधिक्यात वाढ झालेली दिसत आहे. त्यापैकी दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या, तिथेही कर्डिले गटाने त्यातून दोन जागा बिनविरोध जिंकले होते.
कर्डिले कोतकर गटा विरोधात महाविकास आघाडी कडून संदेश कारले व रोहिदास कर्डिले आघाडीवर होते. या दोन उमेदवारांनी देखील चांगली लढत दिली, मात्र तरी ही या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला.
हा विजय सर्वसामान्य जनतेचा असून, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, असे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळी बोलले आहेत.....Read more
Comments
Post a Comment