राहुरी, पाथर्डी मार्केट कमिटी नफ्यात, नगरची तोट्यात कशी ?
अहमदनगर :
गेल्या पंधरा वर्षांपासून राहुरी मार्केट कमिटीचा पारदर्शक कारभार केल्यामुळे पंधरा कोटींचे फिक्स डिपॉझिट असून, संस्थादेखील नफ्यात आहे. त्याच पद्धतीने पाथर्डीची मार्केट कमिटी पूर्वी बारा लाख रुपये तोट्यात होती. ती आज पन्नास लाखांनी नफ्यात आहे. मग जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी नगर मार्केट कमिटी तोट्यात कशी, कारण या मार्केट कमिटीमध्ये मोठा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.लोहसर येथे मंगळवार आयोजित मेळाव्यात आ. तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे होते.
या वेळी आमदार तनपुरे यांनी राहुरी, पाथर्डी मार्केट कमिटीच्या कारभाराचे कौतुक करत नगर मार्केट कमिटीच्या कारभारावर निशाणा साधला. ॲड. प्रताप ढाकणे म्हणाले, पाथर्डी मार्केट कमिटीचे वीजबिल थकले होते, कामगारांचे पगार करणे मुश्किल होते, संस्था तोट्यात होती. मागील पाच वर्षात आम्ही संस्था ऊर्जितावस्थेत आणली. या वेळी युवानेते अमोल वाघ यांचे भाषण झाले.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी पं.स. सदस्य राहुल गवळी, उद्योजक किरण शेटे, उद्धव दुसुंगे, अंबादास डमाळे, भीमराज सोनवणे, युवानेते देवेंद्र गीते, विजय पालवे, अजय पाठक, जालिंदर वामन, बाळासाहेब पालवे, अशोक टेमकर, राजेंद्र म्हस्के, नितीन लोमटे, पोपटराव आव्हाड, सरपंच सुधाकर वांढेकर, श्रीकृष्ण वांढेकर, गणेश खाडे, राजेंद्र लवांडे, पिनू मुळे, विलास टेमकर, जगदीश सोलट, महेंद्र सोलट, राजेंद्र पालवे, कुंडलिक मचे, गोरख पालवे मेजर, डॉ. शिवाजी रामनाथ पालवे, सतीश क्षेत्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते...Read more

Comments
Post a Comment