महाराष्ट्र राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता??
गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नाराजअसल्याच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. आज 18 एप्रिल 2023 रोजी अजित पवार यांनी आपला सासवडमधील कार्यक्रम अचानक रद्द केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते मा. अजित पवार हे पुणे येथील सासवडमध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार होते. परंतु अचानक त्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. मात्र या होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार आहेत.
अजितदादा पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द?
राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे पुणे येथील सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले गेले आहेत. तर दुसरीकडे पाहता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला जाऊन पोहोचले आहेत. बावनकुळेंचा अचानक दिल्लीला दौरा आणि दुसरीकडे अजित पवार यांचे पुणे येथील सासवडमधील सर्व कार्यक्रम स्थगित केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अजित दादा भाजप शी हातमिळवणी करतील का? असा प्रश्न सर्वान पुढे येत आहे.
विरोधी पक्षनेते मा.श्री. अजितदादा पवार यांचे महत्त्वाचे स्पष्टीकरण!
सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. आज, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे.
मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावीअसे ही त्यांनी सांगितले आहे..

Comments
Post a Comment