मनमाडला श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी ..
सभामंडपासाठी ६५ लाखांच्या निधीची आ. सुहास कांदेंची घोषणा.
मनमाड येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथीच्या अनुषंगाने आयोजित सप्ताहानिमित्त आ. सुहास कांदे यांनी श्री दत्त मंदिरात विधिवत पूजन केले. मंदिरासाठी ६५ लाख रुपयांचा सभामंडप बांधून देण्याचे आ. कांदे यांनी यावेळी जाहीर केले. याबद्दल भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले.
दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या दिडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त दि. १२ ते १८ एप्रिलदरम्यान अखंड नामजप, प्रहारे, यज्ञ, श्री गुरुचरित्र व श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा मंगळवारी समारोप झाला. यावेळी दुग्धाभिषेक, पूजा, पारायणसमाप्ती, होम हवन, विष्णुसहस्रनाम, महाआरती व प्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील समर्थ मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
याप्रसंगी सेवेकरी बांधवांनी आ. सुहास कांदे यांचे स्वागत केले. करंजवण पाणी योजनेचे काम वेगाने सुरू असून, या मागे श्री स्वामी समर्थांचाच आशीर्वाद असल्याचे आ. कांदे यावेळी म्हणाले. सभामंडपासाठी आधी मंजूर केलेला ४० लाखांचा निधी वाढवून तो ६५ लाख करीत असल्याचे सांगत, लवकरच सभामंडपाचे उपस्थित होते..
काम सुरू होईल, असेही कांदे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाउपप्रमुख सुनील हांडगे, तालुका समन्वयक महावीर ललवाणी, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरप्रमुख आसिफ शेख, अल्ताफ खान, बबलू पाटील, वाल्मीक आंधळे, लोकेश साबळे, अजिंक्य साळी, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, प्रसिद्धिप्रमुख नीलेश व्यवहारे आदींसह भाविक उपस्थित होते...Read more
Comments
Post a Comment