पुणे-बेगळूरू महामार्गावर भीषण अपघात, सुप्रिया सुळे यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी.
पुणे:-
या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २२ जण जखमी झाले आहेत. खाजगी बस आणि माल वाहतुक ट्रकची ची टक्कर झाली आहे. यावेळी खाजदार सुप्रिया सुळे यांनी अपघात स्थळाची पाहणी केली. हा अपघात पुणे-बेगळूरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ झाला आहे.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे काय बोलल्या?
पुण्यातील नवले पूल परीसरातील स्वामीनारायण मंदिराजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून काही नागरीक जखमी झाले आहेत. येथे भेट देऊन तेथील पाहणी केली आहे. या घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि पुणे पोलीस पोहोचले आहेत, याबद्दल त्यांचे मनापासून आभार. प्रशासनाने देखील या घटनेची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पोहोचण्याची गरज आहे. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकारने उचलावा ही आमची मागणी आहे. शासनाने संवेदनशीलता दाखवून याची तातडीने दखल घ्यावी. असे यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे....Read more


Comments
Post a Comment