मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपला नकोय या मागची काही कारण.
गेल्या काही दिवसांपासून अजित दादा मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी देखील टीका केली होती की एकनाथ शिंदे हे आता भाजपलाच मुख्यमंत्री म्हणून नको आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या मागची काही कारण.
भाजपने आमदार शिंदे सह शिवसेनेचे आमदार कडून सत्ता स्थापन केली पण त्यांनी जसं ठरवलं होतं तसं मात्र होऊ शकलं नाही. भाजपाचा असा अंदाज होता की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणून शिंदे गटाचे महत्त्व वाढवणे परंतु झालं उलटच या घटनेमुळे उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एक भावनिक लाट तयार झाली तिचा फायदा नक्कीच उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी यांना होणार हे भाजपच्या लक्षात आलं आहे.
एकनाथ शिंदे हे मराठा चेहरा जरी असले तरीसुद्धा त्यांचा म्हणावा इतका प्रभाव पडलेला दिसून येत नाही. त्यातच जर कोर्टाचा निर्णय शिंदे गटाच्या विरोधात गेला तर सरकार स्थिर होऊ शकतो हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे पूर्वनियोजित योजना म्हणून राष्ट्रवादीला व अजित पवार यांना आपल्या बाजूने करून घेणे हाही त्या मागचा त्यांचा प्लॅन असू शकतो.
त्यामुळेच कदाचित अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सध्या राजकीय वातावरणात रंगताना दिसत आहेत. त्यातच घडलेलं खारघर चे प्रकरण .खारघरच्या प्रकरणामुळे देखील एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेशर तयार झाला आहे. खारघर घटनेचा सर्व खापर सध्या एकनाथ शिंदे यांच्या माथ्यावर आहे.
अशा अनेक प्रकारच्या घडत असलेल्या घटना यामुळेच कदाचित भाजपलाच एकनाथ शिंदे नको की काय असं वाटत आहे.
Comments
Post a Comment