पै. सौरभ मराठे ने दौला वडगाव केसरी मानाची चांदीची गदा पटकावली.
दौला वडगाव, 28 एप्रिल 2023. दौला वडगाव केसरी किताबाचे मानकरी मराठवाडी चे पैलवान सौरभ मराठे हे ठरले आहेत. नगर तालुक्यातील दौला वडगाव येथील सुप्रसिद्ध कुस्ती आखाड्याची मानाची २०२३ ची गदा मराठवाडी येथील बुर्हानगर तालमीतील पैलवान सौरभ मराठे यांनी जिंकली आहे.
दर वर्षी प्रमाणे दौला वडगाव ग्रामस्थ तसेच यात्रा कमिटीने यावर्षी ही कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी गावकऱ्यांनी प्रथम विजेत्यास रोख स्वरूपात रक्कम न देता चांदीची गदा बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील सर्व नामांकित पैलवान या ठिकाणी चांदीची गदा पटकवण्यासाठी आले होते. तसेच मागील वर्षा पेक्षा या वर्षी आनंदात अशी यात्रा साजरी करण्यात आली. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोषणा देत, पैलवान सौरभ मराठे यांची मिरवणूक ही काढण्यात आली होती. ही मानाची कुस्ती शेवटची होती. या मध्ये दौला वडगाव मानाची कुस्ती म्हणून शेवटची कुस्ती ठेवण्यात आली होती.
यावेळी दौला वडगाव ग्रामस्थ यांचा कडून पै. सौरभ मराठे यांना चांदीचा गदा देत त्यांना रोख स्वरूपात ही भरघोस असा इनाम देण्यात आला. यानंतर कुस्ती आखाड्याची समाप्ती करण्यात आली.
या वेळी सर्व गावकऱ्यांनी सौरभला बक्षीस देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सौरभ हा भविष्यातील महाराष्ट्र केसरी होऊ शकतो अशा शब्दात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.सौरभ हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून कुस्तीचा सराव करत असतो. या यशाबद्दल त्याचे अनेक मान्यवरांकडून कौतुक ही यावेळी करण्यात आले आहे.....Read more


Comments
Post a Comment