Skip to main content

Mafiya Atiq Ahmad : अखेर अठरा वर्षांनंतर तिचा शाप खरा ठरला आहे.

Mafiya Atiq Ahmad :  अखेर अठरा वर्षांनंतर तिचा शाप खरा ठरला आहे. 

ती महिला कोण आहे? 

    ज्या महिलेचा शापाने माफीया अतिक अहमदचे संपूर्ण कुटुंबच संपले आहे.




प्रयागराज: 

         प्रयागराज हॉस्पिटल मध्ये शनिवारी मेडीकलसाठी गॅंगस्टर टर्न पॉलिटीशीयन अतिक अहमदला नेत असतानी आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांचा पोलीसांच्या देखत गुंडांनीच खात्मा केला.

         मात्र आता या घटनेला 18 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा संदर्भ दिला गेला आहे. हाताची मेंहदीही न सुखलेल्या नव्या नवरीने हा शाप दिला होता. माझ्या पतीला जसे तुम्ही मारले गेले तसे 'एक दिवस अतिकच्या पापाचा घडा भरेल' असा शाप लग्नाच्या नवव्या दिवशी कुंकू पुसलेल्या महिलेने दिला गेला होता. कोण आहे ती महिला.. जिच्या शापाने अख्ख्या कुटुंबाची वाट लागली…

        तीन दिवसात अतिक अहमदच्या परीवारामधील तीन जणांना माती दिली. सर्व प्रथम अतिकच्या मुलाला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये यमसदनी धाडले गेले. त्यानंतर दोनच दिवसात अतिक आणि त्याच्या भावाला मीडिया आणि पोलिसाच्या समोर गोळ्या घालून ठार करण्यात आले. शनिवारी रात्री उशीरा घडलेल्या हत्याकांडाचा संदर्भ थेट 18 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनाक्रमाशी जोडला गेला आहे. अतिक आणि त्याच्या हस्तकांचा असा शेवट घडायला एका महिलेचा शाप कारणीभूत ठरला गेला आहे.

अतिक अहमद कुटुंबाला पराभवाचा फटका आणि बदला:

         ही महिला माजी आमदार राजू पाल यांची पत्नी पूजा राजू पाल असे या महिलेचे नाव आहे. ही सर्व घटना 2004 मधी घडली होती. प्रयागराज या शहरातून अतिक अहमद याने लोकसभा निवडणूक जिंकली होती. यानंतर प्रयागराज पश्चिम विधानसभेची पोट निवडणूक लागली होती. 2005 मध्ये या रिकाम्या झालेल्या जागेसाठी पोट निवडणूकीत अतिक अहमदने त्याचा भाऊ अश्रफ अहमद याला मैदानात उतरवले होते. त्याच्या विरोधात बसपाच्या तिकीटावर आ. राजू पाल उभे राहीले होते. तेव्हा पहिल्यांदा अतिक कुटुंबाला राजकारणात पराभवाचा फटका बसला. आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर राजू पाल यांचा विवाह पूजा बरोबर झाला. अगोदर आमदार झाला त्यात लग्नपण ठरल्याचा राजू यांचा दुहेरी आनंद अतिक अहमद कुटुंबिय पचवू शकले नाहीत. म्हणून अतिक अहमदने त्याचा भाऊ अश्रफ अहमदवर राजू पाल यांच्या हत्येची कामगिरी सोपविली गेली.




अश्रफ अहमदने गोळ्यांच्या वर्षावाने हत्या केली:

         25 जानेवारी 2005 रोजी धुमनगंज येथे चारीबाजूंनी घेरून आमदार राजू पाल यांची गोळ्यांच्या वर्षावाने हत्या केली होती. राजू पाल यांना पळवून मारण्यात आल्याने संपूर्ण प्रयागराज हादरले गेले होते. त्यावेळी लग्नाच्या नवव्या दिवशी पतीची हत्या झाल्याने पूजा यांनी शाप दिला होता. माझ्या पतीला जसे मारले तसा एक दिवस तू ही मारशील असा तो शाप दिला गेला होता. पूजाचा शाप अखेर आपले संपूर्ण कुटुंबच उध्वस्त करेल असे अतिकला स्वप्नातही वाटले नसेल. अठरा वर्षांनंतर आज तीन दिवसात अतिकच्या कुटुंबियाचे नोमोनिशान मिटवले गेले आहे. यांची दोन अल्पवयीन मुले जेलमध्ये आहेत. अहमद ची पत्नी शाहीस्ता फरार आहे. दोन दिवसां अगोदर मुलाचा एन्काऊंटर झाला नंतर त्याच्या दोन दिवसात पती अतिक आणि दीर यांचा वर गोळ्या घातल्या गेल्या आहेत....Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...