Pik Nuksan Bharpai : येत्या 10 दिवसात सर्व शेतकऱ्यांना मिळणार पिकाची नुकसान भरपाई :-कृषी मंत्री अब्दुल सत्तार
Pik Nuksan Bharpai : येत्या 10 दिवसात सर्व शेतकऱ्यांना मिळणार पिकाची नुकसान भरपाई :-कृषी मंत्री अब्दुल सत्तार
आत्ताच अवकाळी पाऊस आणि गारपिट नुकसान भरपाई संबंधित एक महत्त्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दहा दिवसांमध्ये अवकाळी नुकसान भरपाईची रक्कम देणार असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांनी सांगितले आहे. पीक नुकसान भरपाईची रक्कम सरकार द्वारे शेतकऱ्यांना किती दिले जाणार आणि कोणत्या निकषावर रकमेचे वाटप करणार आहेत. हे आपण आज सविस्तर पाहूया.
महाराष्ट्र राज्यभरात मागील दोन महिन्यापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाची अशी घोषणा केली आहे.
सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होऊन एक महिना झाला आहे, परंतु अजूनही राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला अवकाळी नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही.
त्या संदर्भात सर्व शेतकरी राज्य सरकारकडे प्रश्न करत होते नुकसान भरपाई कधी मिळणार?
अखेर या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
राज्य सरकार कडून आज घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे, पुढील दहा दिवसांच्या आत सर्व शेतकऱ्यांना सरसकट अवकाळी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
राज्यभरातील 70% पेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे देखील पूर्ण झाले आहेत, उर्वरित पंचनामे एक ते दहा दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सरकार द्वारे सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.
सर्व शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत ही NDRF च्या निकषा पेक्षा जास्त दिली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री अब्बदुल सतार यांनी दिली आहे. याचाच अर्थ असा होतो की दहा दिवसाच्या आत राज्यातील उर्वरित पंचनामे पूर्ण होणार आहेत आणि दहा दिवसानंतर अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारद्वारे नुकसान भरपाई मिळणार आहे.

Comments
Post a Comment