गौतमी पाटीलचा नाच सुरु झाला आणि पत्र्याची शेड खाली कोसळले.
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापुरातील महालगाव येथे गौतमी पाटीलचा काल कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रम पाहण्यासाठी काही रसिक पत्र्याच्या शेडवर उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेत होते. अचानक शेड कोसळल्याने जवळपास 50 लोक खाली कोसळले. यात जवळपास 20-25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अपघात झाला आहे. छत्रपती संभाजी नगरमधील वैजापूर या ठिकाणी गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम चालू झाला आणि अचानक एक अनपेक्षित घटना घडली आहे. गौतमी पाटील ही तिचा नृत्यामुळे कायम चर्चेत आहे. परंतु आता सदर छत्रपती संभाजी नगरमधील घटनेमुळे पुन्हा गौतमी पाटील ही चर्चेत आली आहे.
यावेळी छत्रपती संभाजी नगरमधील वैजापूर या ठिकाणी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील येणार म्हटल्यावर कार्यक्रमाला गर्दी झाली होती. परंतु या चाहत्यांचा जीव बेतेल असा प्रसंग यावेळी घडला आहे. सदर ठिकाणी गौतमीचा नाच पाहण्यासाठी काही चाहते एका पत्र्याच्या दुकानाच्या शेडवर बसले होते. गौतमीचे नृत्य सुरु झाले. यावेळी राती अर्ध्या राती हे प्रसिद्ध असे गाणं सुरु होतं. तेवढ्यात पत्र्याचा शेडवर वजन जास्त झाल्याने पत्र्याची शेड डायरेक्ट खाली कोसळले गेले. यावेळी या संदर्भातला व्हिडीओ संपूर्ण व्हायरल होतो आहे. त्यामुळे गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली आहे. या घटनेत काही लोक जखमी झाल्याची ही माहिती आहे. मात्र नेमके किती लोक जखमी झाले ते अद्याप समजलेले नाही.
महाराष्ट्रातील सबसे कातील गौतमी पाटील या नावाने गौतमी सोशल मीडियावर फेमस आहे. एवढंच काय तर तिच्या डान्सचा कार्यक्रम असला की तिथे गर्दी होतेच. परंतु अशा काही घटना घडतात ज्यामुळे गौतमी पाटीलची चर्चा होते. आता वैजापूरमधल्या महालगाव या ठिकाणी जी घटना घडली त्यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महालगाव येथे गौतमी पाटील हिचा बस स्थानकाजवळ कार्यक्रम सुरू होता. गौतमी पाटीलला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. जागा मिळेल तिथे लोक बसले होते. काही लोक पत्र्याच्या शेडवरही बसले होते. मात्र या लोकांच्या वजनाचा भार पत्र्याच्या शेडला जास्त झाला आणि शेड कोसळली. त्यामुळे भर कार्यक्रमात गौतमी पाटील नाच करत असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी लोकांन ची गर्दी कमी केली असे सांगितले गेले आहे.....Read more
Comments
Post a Comment