तब्बल 3 कोटी 72 लाखाची रोकड हडपसर येथून जप्त.एक व्यक्ती ताब्यात. कर्नाटक इलेक्शन च्या तोंडावर पोलिसांची कारवाई
तब्बल तीन कोटी बहात्तर लाखाची रोकड हडपसर येथून जप्त.एक व्यक्ती ताब्यात. कर्नाटक इलेक्शन च्या तोंडावर पोलिसांची कारवाई.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदर व्यक्ती सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या चार चाकी गाडी मधून प्रवास करत होता. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तब्बल 3 कोटी 72 लाखाची रोकड जप्त करण्यात आली. कर्नाटक इलेक्शनच्या तोंडावर पोलिसांनी कारवाई केली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रशांत धनपाल गांधी हा व्यक्ती आपल्या आपल्या ब्रिजा कार MH 13 सी के 2111 गाडीमधून प्रवास करत होता. पोलिसांना सदर व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्या गाडीची झडती घेतली असता, त्याच्या गाडीमध्ये असणाऱ्या बॅगमध्ये सदर रक्कम आढळून आली. सदर व्यक्तीकडे चौकशी केली असता आपणही रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितलं. सदर रक्कम ही घेतलेल्या कर्जापोटी भरायचे आहे असे त्यांनी सांगितले. परंतु पोलिसांना त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर व्यक्तीची पोलीस कसून चौकशी करत आहेत. सदर रकमेचा आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा काही संबंध आहे का हे देखील तपासून पाहत आहेत. इतक्या मोठा प्रमाणावर रक्कम आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे......Read more
Comments
Post a Comment