बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचात चर्चा.
बारसू रिफायनरी मुद्द्यावरुन राज्यात चांगलच राजकारण तापलेल असतानाच आता अजित पवारांनी यावर मोठं विधान केले आहे. 'वेळ पडल्यास मी स्वत: बारसूमध्ये जाणार' असल्याचं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यावेळी अजित पवारांनी मुंबईतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
अजित पवार म्हणाले, कोणताही प्रकल्प करत असताना त्याचा निसर्गावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारने घ्यायला हवी. तसेच पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास या प्रकल्पामुळे झाला नाही पाहिजे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेचा फायदा होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या बाजूने भूमिका घेणार असल्याचे यावेळी ठामपणे अजित पवारांनी सांगितले.
त्या ठिकाणी स्थानिक आंदोलकांचा विरोध कशासाठी आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. जर सर्व जनतेचा फायदा होणार असेल, तर या प्रकल्पाबाबत आंदोलकांनी समजून घेतले पाहिजे. तसेच राज्य सरकारने ही आंदोलकांनशी चर्चा करुन त्यांचे होणारे गैरसमज दूर केले पाहिजेत. याबाबत तेथील स्थानिकांशी चर्चा करुनच प्रकल्प करावेत, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकल्पाबाबत अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा काय झाली?
त्याच प्रमाणे या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक जनतेला रोजगार निर्माण होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक रोजगारासाठी बाहेर जाणार नाहीत. या संदर्भात सर्व चर्चा माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झाली आहे. त्यामुळे वेळ पडली तर बारसूमध्ये जाणार असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत.
या बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत ज्या त्या पक्षाची वेगळी भूमिका असू शकते ते मला मान्य आहे. तसेच ठाकरे गटाचे संजय राऊत आणि राजन साळवी यांची भूमिका वेगळी आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस कायम राजकारणाचा पुढे जाऊन विकासाच्या बाजूने भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे वेळ पडली तर बारसूमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रिफायनरी प्रकल्प काय आहे?
हा रिफायनरी प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पांपैकी एक आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील तीन प्रमुख तेल कंपन्या या प्रकल्पाचा भाग असणार आहेत. यासोबतच आखाती देशांच्या सौदी अरमाओ आणि ANDOC जॉइंट या दोन मोठ्या कंपन्याही या प्रकल्पाचा भाग असणार आहेत.
स्थानिक नागरिक या प्रकल्पाला विरोध का करत आहेत?
या प्रकल्पामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होणार असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तसेच त्यांची फळझाडे नष्ट होतील असेही त्यांनी सांगितले आहे. रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे तेथील नद्यांचे पाणी प्रदूषित होईल. त्याचा थेट परिणाम त्यांचा मासेमारी व्यवसायावर होणार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Comments
Post a Comment