शरद पवारांची मोठी घोषणा, अध्यक्षपदाचा राजीनामा मागे
माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहस्त राजीनामाचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तरी या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांनी यावेळी सांगितले आहे की, नव्या नेतृत्वासाठी संघटनात्मक बदल करणार आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये नवीन उत्तराधिकारी निर्माण व्हायला हवा, असे ते यावेळी बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामाचा निर्णय मागे घेतो, परंतु कोणते ही जबाबदारी चे पद मी घेणार नाही असेही ते यावेळी बोलले आहेत.
शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. शरद पवारांनी २ मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. परंतु आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर केला गेला आहे. त्यानंतरी संध्याकाळी ५:३० वाजता पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा मागे घेतला गेला आहे.
शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हंटले आहेत?
'लोक माझे सांगाती' ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी दि. २ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे आणि निवांत राहिलेले जीवन जगावे, अशी मी भुमिका घेतली होती. मात्र मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली गेली होती. तरी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती' असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मी सदर निर्णयाचा फेरविचार करावा, याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षाचे सहकारी व कार्यकर्ते यांनी ही मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली आहे.
'लोक माझे सांगाती' हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. आणि एखाद्या राजकारणी व्यक्तीला यापलीकडे काय हवे असते. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही आणि होऊ ही देणार नाही, आपण सर्वांनी दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी पूर्ण भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या याचा मी स्वतः विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून तसेच सर्वसामान्य जनतेचा ही मी विचार करून मी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा पुन्हा विचार केला आहे.
पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.
मी पुनः अध्यक्षपद स्विकारत असलो, परंतु आपल्या संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे गरजेचे आहे. असे माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा सर्वात जास्त भर असेल. मागील काळा मध्ये जसे काम केले त्याहीपेक्षा यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करीन आणि करत राहील असे म्हंटले.
आपण सर्वांनी सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आणि संपत्ती आहे. माझ्या जीवनातील यश अपयशात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिन. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो, असे बोलून पत्रकार परिषद संपवली......Read more

Comments
Post a Comment