अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन संपवले जीवन. एकावर गुन्हा दाखल.
अहमदनगर मधील अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या.
अहमदनगर मधील अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. सदर मुलगी नगर तालुक्यातील पांगरमल येथे राहत होती.
तिने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ही घटना सायंकाळ चा सुमारास घडली आहे. मुलीचा चुलत्याने एमआयडीसी अहमदनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
त्या अल्पवयीन मुलीचे वय १६ वर्ष होते. मुलीचा चुलत्यानी दिलेल्या फिर्यादनुसार एका जना वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हेगार प्रवीण आव्हाड व्यक्तीचे नावे फिर्याद देण्यात आली आहे. गुन्हेगार प्रवीण आव्हाड हा राहणार चिचोंडी शिराळ, पाथर्डी, अहमदनगर येथील असून याचा नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अल्पवयीन मुलगी रोज शाळेला जात होती. या अल्पवयीन मुलीची प्रवीण आव्हाड रोज शाळेला जात असताना, वेळोवेळी छेड काढत होता, असं मुलीचा चुलत्या कडून सांगण्यात आले आहे.
तसेच प्रवीण आव्हाड हा सोशल मीडिया वरून रोज मेसेज आणि व्हिडिओ पाठवत त्रास देत होता. त्यामुळे या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने राहत्या घरात ओढणी ने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. सदर मुलीने त्रासाला कंटाळून आणि घरचा भीतीमुळे स्वतःचे आयुष्य संपवले असे मुलीच्या चुलत्या कडून सांगण्यात आले आहे. या बाबत आणखी तपास पोलिस अधिकारी करत आहेत.
Comments
Post a Comment