आंबेडकर जयंती साजरी न केल्याने सरपंचासह ग्रामसेवकाविरोधात तक्रार...
पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथे दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली नाही. याबाबत आंबेडकर प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करत सरपंचासह ग्रामसेवकाविरोधात लेखी निवेदन देऊन तकार दाखल केली आहे.
तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांना निवेदन दिले आहे.
याबाबत पाथर्डी पंचायत समितीला निवेदन देण्यात आले असून, आठ दिवसांत कारवाई करण्याची मागणी खांडगाव ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत खांडगाव ग्रामस्थांनी आरपीआयचे अरुण शेरकर, रोहित गायकवाड, किसन गायकवाड, श्रीकांत गायकवाड, अशोक गायकवाड, साईनाथ गीते, अक्षय वाघ, राहुल नाही, कांतीलाल गायकवाड, राजू गायकवाड, सुनील गायकवाड, . चैतन्य गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी खांडगाव ग्रामपंचायतमध्ये जयंती साजरी करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामसेवक व सरपंच गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी असं म्हटले आहे..... Read more

Comments
Post a Comment