दिल्लीत धडकणार महाराष्ट्र भवनातील अधिवेशनाचे उद्या उद्घाटन....
सभापती दिव्या पाटील यांची माहिती सकाळ माध्यम समूहाच्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'चे (यिन) वादळ आता दिल्लीत धडकणार आहे. प्रथमच केंद्रीय अधिवेशन थेट देशाच्या राजधानीत मंगळवारी (ता. २५) आणि बुधवारी (ता. २६) आयोजित करण्यात येत आहे.
'यिन'च्या १० समित्यांचे राज्यभरातील प्रतिनिधी दिल्ली येथील केंद्रीय अधिवेशनात सहभागी होत आहेत. मंगळवारी प्रतिरूप सभागृहाचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते पार पडेल. या वेळी केंद्रीय समितीच्या सभापती दिव्या पाटील अहवालाचे वाचन करतील. तर पहिल्या दिवसाच्या अधिवेशनात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर आणि युवा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कसेनेचे राज्य सचिव किरण साळी मार्गदर्शन करणार आहेत. बुधवारी (ता. २६) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुथूला, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव डॉ. ओमप्रकाश शेटे, धावपटू, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णराज महाडिक मार्गदर्शन करणार आहे. अधिवेशनात काही महत्त्वाचे ठरावही पारीत करण्यात येणार आहेत. हे अधिवेशन यशस्वीपणे पार पडावे, यासाठी खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे......Read more

Comments
Post a Comment