आठवड्या बाजारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा झाला बाजार समितीत संचालक...
बीड:-
मराठवाड्यातील बीडच्या बाजार समितीमध्ये धनंजय गुंदेकर यांचा झालेला विजय थोडा अनोखा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शालेय जीवनापासूनच त्याच्यात लोकचळवळीचे गुण होते. उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्याने पत्रकारिता केली, शिक्षण पूर्ण केल्यावर तो काही राजकीय व्यक्तींकडे पी. ए. म्हणूनही त्याने काही काळ काम केले. त्यामुळे सामान्य जनते मध्ये चांगलीच ओळख निर्माण झाली होती. तसेच सामान्य जनतेचे प्रश्न ही चांगल्या प्रकारे सोडवत होता. हे सगळं करताना त्याला त्याच्यातील धडपडणारा कार्यकर्ता स्वस्थ बसू देत नव्हता.
२०१७ ला आंबेसावळी ग्रामपंचायतीत धनंजयने त्याचे पॅनल उभे केले. ते दणकून आपटले. त्या दिवसापासून तर त्याने शासकीय अन्यायाने पिचलेल्या जनमाणसांसाठी स्वतःला झोकून दिले. बीड तालुक्यात शेतकऱ्यांना पिकविम्याची भरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. अभ्यासू वृत्तीने स्वतःची जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली. छोटेसे का होईना पण सामान्यांसाठी लढणारा उमदा युवक अशी छाप पाडली. २०२२ ला पुन्हा ग्रामपंचायतला पॅनेल टाकले. यावेळेस गावकऱ्यांनी धनंजयला मनापासून साथ दिली, त्याचे पॅनल निवडून आले. यावेळी बीड बाजार समिती निवडणूक लढायची घोषणा त्याने केली. पॅनल टाकायची तयारी सुद्धा केली पण स्थानिक आमदारांनी मध्यस्थी करून महाविकासआघाडी घडवून आणली; अन ग्रामपंचायत सर्वसाधारण सदस्यांमधून धनंजयला उभे केले. त्याच्यामध्ये असलेल्या लढाऊ बाणयामुळे सर्व मित्र, सख्या सोबतींची फौज उभी राहिली.
आज वयाच्या 28 व्या वर्षी धनंजय बीड बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आला आहे. बीड जिल्ह्यातून चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवे उमदे नेतृत्व उभे होतेय हे पाहून सर्वांना खूप आनंद झाला. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जो संघर्ष तू रस्त्यावर केला, तसाच न्याय तू त्यांना देशील याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना खूप आनंद झाला...
सदर फोटो - बाजारसमितीचा प्रचार करत असताना एका बाजारात धनंजय अन त्याचे वडील भाजीपाला विकत बसलेले आहेत.....Read more



Comments
Post a Comment