शिवरायांचा पुतळा आता सातासमुद्रा पार ! देवेंद्र फडणवीस उद्घाटनासाठी रवाना.
मॉरिशसचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम, काही सामंजस्य करार सुद्धा होणार आहेत. तसेच महाराष्ट्र भवनाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज शुक्रवारी २८ एप्रिल रोजी सातासमुद्रापार लोकार्पण सोहळा होणार आहे.
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा आता सात समुद्र पार उभारण्यात येत आहे. शिवरायांनी केलेले महान कार्य जगामध्ये पोहोचावे यासाठी अनेक शिवभक्त प्रयत्न करत आहेत. तसेच सरकार देखील असे प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवरायांबद्दल बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये युनिव्हर्सिटी मध्ये शिकवले जात आहे. ज्यांच्या जीवनातून समाजातील प्रत्येक घटकाला शिकण्यासारखी खूप साऱ्या गोष्टी आहेत. युगपुरुषाचा पुतळा सातसमुद्रा पार उभारण्यात येत असून हे नक्कीच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
हा सोहळा सातासमुद्रापार मॉरिशमध्ये होणार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण देशासाठी तसेच महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असणार आहे.
सातासमुद्रापार मॉरिशसमध्ये आपले महाराष्ट्रातील सुमारे ७५ हजार मराठी बांधव आहेत. सर्व मराठी बांधव महाराष्ट्रातील पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून आहेत. त्यांनी सातासमुद्रापार आपली मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे ५४ संघटना आहेत असे सांगण्यात आले आहे. या सर्व ५४ संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आला आहे. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनची स्थापना १ मे १९६० रोजीच झाली आहे. आपल्या महाराष्ट्रातील शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे केले जातात. येथे या संघटना मार्फत एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले आहे. त्याच्या विस्तारासंदर्भातील सुद्धा काही त्यांचा मागण्या आहेत.
आजचा दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात असे सांगितले जात आहे. या टप्पा-२ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता देखील दिली आहे. मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू यांनी ८ मार्च २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी चर्चा करण्यात आली होती.
सदर दौर्यात मॉरिशस-इंडिया बिझनेस कम्युनिटीसोबत सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज भेटणार आहेत. यामध्ये काही सामंजस्य करारावर सुद्धा स्वाक्षरी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दौऱ्यात सर्वसामान्य जनतेला पर्यटन अणि उद्योग क्षेत्रात महत्वाचे करार अपेक्षित आहेत. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वी राजसिंग रुपून यांची सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट घेणार आहेत.
परदेशात सातासमुद्रापार महाराष्ट्राचा अभिमान चांगलाच वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत ऊस्तूकता देखील लागली आहे असे जनतेकडून सांगण्यात आले आहे.
मॉरिशस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कोणते महत्वाचे निर्णय घेतले?
मॉरिशस मध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या १२ फूट उंची अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ यांनी केले. येथील मराठी फेडरेशनला ८ कोटी रुपये, १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व मराठी बांधवांसाठी कक्ष स्थापण करणार असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले...Read more


Comments
Post a Comment