विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी पत्रात काय लिहले आहे?
आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रामार्फत अशी मागणी केली गेली आहे.
आपले राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र दिनीच ही घोषणा करावी, यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करतो. केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्र दिनी आपल्या महाराष्ट्राला अमृतकाळातील भेट द्यावी असे सांगितले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा:
आपल्या सर्वांचा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्राकडून केंद्र सरकारकडे गेली १० वर्षे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भाषा, संस्कृती तसंच साहित्यविषयक संस्थाही त्या संदर्भात वेळोवेळी सनदशीर मार्गानं आवाज उठवत आहेत. परंतु याबाबत केंद्र सरकार कडून आणखी काही ही सांगण्यात आले नाही.
तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठ पुरावा करून १ मे लाच याबाबत घोषणा करावी अशी मागणी करतो.
कसे आहे पत्र?
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत असल्याचं एकूण परिस्थिती पाहता स्पष्ट झालं आहे. साहित्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालयापासून सर्व संबंधित विभागांनी त्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. फक्त केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब करणं बाकी आहे....Read more



Comments
Post a Comment