बीड येथील मुंडे भावा-बहिणीतील मतभेद दूर; धंनजय मुंडेचे पंकजाताईंना खुल्या मनाने रिटर्न गिफ्ट!
बीड परळी वैजनाथ येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची बुधवारी हितचिंतक सभासद म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या अगोदर पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठे गिफ्ट देत, आपल्या ताब्यातील येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील पंकजाताईंना मोठे रिटर्न गिफ्ट दिले आहे.
जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेवर पंकजा मुंडे यांची हितचिंतक सभासद म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथील निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी हितचिंतक सभासद गटातून उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात संस्थेचे सदाशिव आप्पा मुंडे यांचे भाचे बालाजी रामचंद्र गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बालाजी गिते यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे पंकजा मुंडे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. यापूर्वी ही आश्रयदाता सभासद गटाची जागा बिनविरोध निवडून आल्याने आता ३२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे....Read more
Comments
Post a Comment