१८ लाखांचा घोळ केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल.
अहमदनगर:-
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील दिघी गावातील ग्रामपंचायतमध्ये 14 व्या वित्त आयोगाचे निधी मध्ये तब्बल 18 लाख 33 हजार 500 रुपयांचा घोळ केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवका विरुद्ध नेवासा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत मध्ये 14 वा वित्त आयोग अंतर्गत शासनाकडून जमा झालेल्या निधीचं अयोग्य वापर केल्या कारणाने सदर ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरोधात चौकशी करण्यात येत आहे.
या बाबत नेवासा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नवनाथ देवराय पाखरे (वय 55) रा.नेवासा फाटा यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, २० डिसेंबर २०२१ रोजी गटविकास अधिकारी यांनी मौजे दिघी ता. नेवासा येथील १४ वा वित्त आयोग निधीमधील पैशाची चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये उपलब्ध लेख्यांची तपासणी, पाहणी करुन अपहारीत रक्कम रुपये १८ लाख ३३ हजार ५०० बाबतचा चौकशी अहवाल सादर केला गेला आहे. आणखी पुढील तपास सुरू आहे असे सांगण्यात आले आहे.....Read more

Comments
Post a Comment