अहमदनगरची महिला भाग्यश्री महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेती २०२३
कोल्हापुरमध्ये झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरची भाग्यश्री फंड विजेती ठरली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून राजर्षी शाहू खासबाग मैदानात ही कुस्ती स्पर्धा झाली आहे. या कुस्ती स्पर्धा मध्ये कोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले आहे.
दीपाली भोसले-सय्यद यांनी सरकारकडून क्लास वन नोकरीची मागणी:
त्यामागील फेरीत भाग्यश्री विरुद्ध सांगलीची प्रतीक्षा बागडी यांच्यात देखील चांगलीच लढत झाली होती. पहिली फेरी ही अमृताची लढत कोल्हापूरच्याच वैष्णवी कुशाप्पाशी झाली होती. ही लढत अमृताने जिंकली होती.
यावेळी विजेत्या भाग्यश्रीला पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भाग्यश्रीला चांदीची गदा व चारचाकीची चावी सुपूर्द करण्यात आली होती. तर त्यावेळी प्रत्येक वजनगटातील विजेत्या पैलवानांना दुचाकी प्रदान करण्यात आली होती. यावेळी दीपाली भोसले-सय्यद यांनी पुढील हिंदकेसरी ठाण्यात घेणार असल्याचे सांगितले आहे. तीनवेळा महाराष्ट्र केसरी विजेत्यांना क्लास वन नोकरी द्या, अशी ही मागणी दीपाली भोसले-सय्यद यांनी यावेळी केली आहे......Read more

Comments
Post a Comment