जिल्हाधिकारी ठरले गावकऱ्यांचे हिरो, थेट बैलगाडीतून मिरवणूक.
पुणे:
भोर तालुक्यातील जिल्हाधिकारी ठरले गावकऱ्यांचे हिरो, थेट बैलगाडीतून मिरवणूक. ग्रामीण भागाचा वारसा आणि वसा जोपासणारे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर राजेश जी देशमुख यांचे शतशः आभार व्यक्त करताना.
ग्रामीण भागातील जनतेने चांगलं सत्कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याचा हा सन्मान सोहळा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेसाठी उद्बोधक ठरावा असं हे उदाहरण पाहिलं तर कर्मचारी अधिकारी वर्गाला देखील आपल्या संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा अधिकारी म्हणून यांच्याकडे पाहता येईल आणि कुठलाही लवाजमा न ठेवता जिल्हाधिकारी महोदयांना शेतकऱ्याच्या वाहनातून म्हणजे बैलगाडीतून प्रवास करावा ही त्यांच्या आई-वडिलांनी दिलेले संस्कारच आहेत याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांचा सर्व जीवन प्रवास खडतर आहे. आणि अशा अधिकाऱ्यांचं यथायोग्य वर्णन पुस्तकांमधून सुद्धा व्हावं आणि अशा अधिकाऱ्यांचा शैक्षणिक पाठ्यक्रमामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी एखादा धडा असावा. अशी नम्रतेची विनंती शासन दरबारी सर्वांनी केली आहे. अशा सकारात्मक भावनेसह गावकऱ्यांनी मागितले आभार.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश जी देशमुख यांनी काय काम केले आहे?
पुणे भोर तालुक्यातील येवले येथील भिलारे वस्ती, मालुसरे वस्ती आणि खंडाळे वस्ती या ठिकाणी जाणारा रस्ता गेल्या ५० वर्षांपासून बंद होता. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. या रस्त्याची शासकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पाहणी केली आणि हा रस्ता खुला केला. येथील गावकऱ्यांनी आनंदात त्यांची वाजत गाजत थेट बैल गाडीतून मिरवणूक काढली.....Read more


Comments
Post a Comment