माजी खासदार राजू शेट्टी यांचे गंभीर आरोप !
महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. असा वक्तव्य त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. शासकीय बदल्या साठी राजकारणी लोक नोकरदार व्यक्तींनकडून लाखो रुपये उकळले जात आहेत. जो घेतो तो सांगत नाही, पण जर देतो तो अनेक ठिकाणी सांगतो.
सरकारी अधिकारी आणि तो सांगतो मी काय फुकट आलो नाही, मी एवढे एवढे पैसे देऊन आलो आहे. मला कोणी काही विचारू शकत नाही. जे विचारू शकतात त्यांनाच आम्ही पैसे दिले आहेत. कोणीच काही वाकड करू शकत नाही. अशी निर्लज्ज भूमिका हे सर्व लोक मिळून करत आहेत. हा त्रास सामान्य माणसांना होतो आहे. आज तहसीलदार ऑफिसला तसं नोंदीसाठी कमीत कमी पाच हजार रुपये द्यावे लागतात. तसेच तलाठी पाचशे रुपये घेत आहेत. त्यानंतर तलाठी कडून पुढे सर्कलला जावं लागते. त्यांनाही मागेल तेवढे पैसे द्यावे लागते. कारण आपले काम अडकून ठेवतात.
हे लोक त्यामुळे सामान्य जनता ही देखील विचार करत नाहीत. महाराष्ट्रात पोलीस गाडी अडवतात तिथेही पैसे मागतात. शासक सेवेतील प्रत्येक अधिकाऱ्यांच्या बदलीचे दर ठरले आहेत. त्यामुळे हे शासकीय लोक खालील जनतेस वेठीस धरतात आणि आपली पैसे मोकळे करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सर्व सामान्य जनता या मध्ये भरडली जात आहे. हे लोक तेवढ्यावरच थांबत नाहीत जिथे मिळेल तिथे वसूल करण्याचा मागे लागतात. असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पत्र लिहिले आहे त्यांनी सांगितले आहे माझ्यावर जी कारवाई करायची ते करा कोर्टात यायला पण तयार आहे असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.....Read more


Comments
Post a Comment