लग्न लावून देण्यास नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण.
मुलीचा घरच्या लोकांनी लग्न लावून देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातूनच अपहरण करण्यात आले आहे.
सदर व्यक्तींनी काय केले बघुया?
मुलीच्या घरच्या लोकांनी लग्न लावून देण्यास स्पष्ट नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण करून पळवून नेले गेले आहे. सदर घटना ही दिनांक २१ एप्रिल रोजी घडली असून, या बाबत पोलिस ठाण्यात अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुलीचे वय १५ वर्षे ९ महिने आहे. त्यामुळे सदर मुलगी ही वय कमी असल्यामुळे अल्पवयीन मुलगी आहे. ही मुलगी तीच्या नातेवाईकांसोबत अहमदनगर मधील नेवासा तालुका, शनी शिंगणापूर रोडवर असलेल्या एका गावात राहते. हा मुलगा अहमदनगर मधील राहुरी तालूक्यातील, ब्राम्हणी येथील आहे. सदर मुलाचे नाव सुनिल सहदेव सुर्यवंशी असे आहे. सुनिलने सन २०२२ मध्ये त्या मुलीच्या घरी देखील गेला होता. सुनिलने मुलीचा घरी जाऊन तीच्या सोबत लग्न करण्यासाठी मागणी देखील घातली होती.
मात्र मुलीच्या नातेवाईकांनी मुलगी लहान असल्याचे कारण सांगितले होते. त्याला माहित होते आपल्याला लग्नाला नकार दिला आहे. त्यामुळे सुनिल सुर्यवंशी याने वेळोवेळी मुलीचा घरचाना धमकी देखील देली होती.
सुनील काय बोलून धमकावत होता मुलीचा नातेवाईकांना?
मुलीचा नातेवाईकांना तो सांगत होता, "मुलीचे माझ्या सोबत लग्न लावुन दिले नाहीतर मी तिला पळवुन घेवुन जाईल", अशी धमकी त्यांनी दिली होती. मुलीचा नातेवाईकांना त्याला न जुमानत काही ही केले नाही. परंतु, दि. २० एप्रिल २०२३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी व तीच्या घरातील इतर लोक झोपी गेले होते. मात्र दि. २१ एप्रिल रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास ती अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले.
मुलीच्या नातेवाईकांनी तीचा परिसरात खूप शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तसेच पिडीत मुलीला लग्नासाठी मागणी घालणारा सुनिल सहदेव सुर्यवंशी हा देखील त्याचे राहते घरी मिळुन न आल्याने त्यांची खात्री झाली की, त्यानेच त्या मुलीला लग्नाचे आमीश दाखवुन फुस लावुन पळवुन नेले आहे, असा पिडीत मुलीच्या नातेवाईकांना संशय आला आहे.
सदर मुलीच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनिल सहदेव सुर्यवंशी राहणार ब्राम्हणी, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ४२५/२०२३ भादंवि कलम ३६६ प्रमाणे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत.....Read more

Comments
Post a Comment