अहमदनगर मधील मतदारांना दहशतीने सहलीला पाठवल्याची 'मविआ'ची तक्रार.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती लोकसत्ता प्रतिनिधी.
अहमदनगर:
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार हे मतदारांवर दहशत निर्माण करून बळजबरीने बुऱ्हाणनगर येथे बोलवून घेवुन, दमदाटी करून मतदारांना सहलीवर पाठवत आहेत. बळजबरीने सहलीला पाठवलेल्या मतदार व त्यांच्या कुटुंबाला काही झाल्यास त्यास जबाबदार राहतील, असे निवेदन नगर तालुका महाविकास आघाडीचा कार्कर्त्यांसमवेत जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
या दिलेल्या निवेदनावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संदेश कार्ले, शरद ढगे, संगीता ठोंबरे, राजेंद्र भगत, संदीप कर्डिले, रामदास भोर, प्रवीण कोकाटे, महेंद्र शेळके, रामेश्वर सोलट यांच्या सह्या आहेत.
सदर निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भ्रष्ट कारभार महाविकास आघाडीने वेळोवेळी उघड केला आहे. अनधिकृत गाळे विक्रीतून सत्ताधाऱ्यांनी मोठा निधी कमावला तसेच बाजार समितीच्या वार्षिक उत्पन्नावर डल्ला मारत मलिदा यामागील काळात खाल्ला आहे. याचा जाब मतदार सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांना विचारत आहेत. सध्या परिस्थिती बघता महाविकस आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नगर बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. ती भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या हातून वाचवण्यासाठी महाविकास आघाडी निवडणुकीत उतरली आहे. आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार यांची साथ महाविकस आघाडीला मिळाली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातून त्यांनी मतदारांवर दहशत सुरू केली आहे. सर्व मतदारांना बळजबरीने बंगल्यावर नेऊन त्यांच्यावर दडपण टाकून इच्छा नसताना सहलीला पाठवले जात आहे. खुल्या वातावरणात निवडणूक होऊ न देण्यासाठी हे सर्व कृत्य केले जात आहे.
नगर तालुक्यातील सर्व मतदार वाड्यावास्त्यांवर राहतात. दूध तसेच शेती व्यवसाय करणारे आहेत. तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मतदारांची इच्छा नसताना त्यांना बळजबरीने घरून नेले जात आहे. त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे? सहलीला नेलेल्या उमेदवारांना प्रवासात काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोणाची आहे ? याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.....Read more

Comments
Post a Comment