ब्रेकिंग न्यूज: अहमदनगर शहरामध्ये पुन्हा एकदा तरुणावर हल्ला.
हे सर्व वाद कशामुळे घडतात?
मागील काही दिवसांपासून नगर शहरांमध्ये जातीय तणाव वाढला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी अहमनगर बाजार पेठेतली घटना असेल, रामवाडी येथील घटना असेल, शहर जवळील गजराज नगर येथील घटना असेल. अशा अनेक घटना घडलेल्या असताना आता आणखी एका तरुणावर नगरमध्ये काल रात्री हल्ला झाला.
नगर शहरामध्ये नवीन वाद कुठे झाला?
समजलेल्या माहितीनुसार काल रात्री दोन जणांमध्ये माळीवाडा परिसरातील बारातोटी कारंजा येथे वाद झाला. नंतर या वादाचे पडसाद नगर शहरात पाहायला मिळाले. तसेच एका वाहनाचे देखील तोडफोड करण्यात आली. सदर ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा तातडीने दाखल झाला. त्यामुळे नगर परिसरातील तणाव निवळला गेला आहे. सदर ठिकाणी अहमदनगरचे पीआय साहेब पोहोचल्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात केली आहे. वारंवार होत असलेल्या शहरातील हल्ल्यांमुळे शहरातील वातावरण व तसेच उद्योगधंद्यांवर देखील त्याचा परिणाम होत आहे, तरी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी प्रशासनाने सर्वांना विनंती केली आहे....Read more

Comments
Post a Comment