नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती शिवारात अंगावर वीज पडून सविता राजू बर्फे या महिलेचा जागीच मृत्यू झाला
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती शिवारात अंगावर वीज पडून सविता राजू बर्फे या महिलेचा जागीच मृत्यू.
अहमदनगर:
आज अहमदनगर नेवासा तालुक्यातील जेऊर रोड तांबे वस्ती शिवरात कांदे काढण्यासाठी गेलेले असताना. अचानक अवकाळी संकट आल्याने अचानक पाऊस, वारा व विजेचा कडकडाट सुरू झाला. तेवढ्यात कांदे काढणाऱ्या महिला पळापळी करू लागल्या. तेवढ्यात अचानक सविता राजू बर्फे या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा आकस्मित जागीच मृत्यू झाला. महिलेचे वय 42 होते तर तिच्या मागे पती, मुलगा, मुलगी, भाऊ, आई असा मोठा परीवार आहे.
यावेळी गावात खबर पसरताच गावातली लोकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेतली .यावेळी नेवासा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाना पोलीस नाईक तुकाराम खेडकर, पोलिस नाईक तांबे, बबलू चव्हाण यांनी स्पॉट पाहणी केली. व जागेवरील पंचनामा करून मृतदेह नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात आला आहे. तरी सरकारने या घटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खाली दिलेला व्हिडिओ पहा. अशे जर वादळ असेल तर शेतकरी शेतामध्ये कसे संरक्षण करेल स्वतःचे.
आज शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात टाकून ऊन, वारा, पाऊस याचा सामना करत आहे. पण आपले सरकार याकडे लक्ष न देता स्वतः या पक्षात जाऊ की दुसऱ्या या मध्येच दंग झालेले दिसते. मीडिया त्यांचा मागे कॅमेरा घेऊन पळण्यात व्यस्त दिसत आहेत. आपला शेतकरी राजा शेती मालाला भाव द्या, ओरडुन थकला आहे, तरी त्याचा कडे कुणाचे लक्ष दिसेना. आज महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेला, कुणाला ही दिसेना असा झालाय. त्यामुळे शेतकरी राजा अश्या घटनांना सामोरे जाताना दिसत आहेत. तरी सर्व शेतकरी राजांना विनंती आहे, स्वतःची काळजी घ्या, तुम्ही आहात, म्हणून संपूर्ण जग २ घास खाऊन झोपते.......Read more

Comments
Post a Comment