महाराष्ट्रातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेस सुरुवात.
आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेस प्रारंभ झाला आहे.
राज्यस्तरीय परिषदेत आजचे महत्वाचा मुद्यांवर विचार विनिमय झाले. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी येत्या जूनपासून ई - पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
पुढील काळात मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई -पंचनामा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पारदर्शक पध्दतीने आणि तातडीने मदत मिळावी, याकरिता सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली आहे. आता एसडीआरएफच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. याशिवाय जमीन ३ हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. आपले महाराष्ट्र शासन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना आधार देणे, हेच आपले कर्तव्य आहे. जून महिना सुरु झाला की वीज पडून होणारे मृत्यू आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू हे सर्व टाळण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केली आहे.....Read more


Comments
Post a Comment