शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात उंदरांचा सुळसुळाट...
छत्रपती संभाजीनगर:
आनंदाचा शिधा वाटप आणि आता मुलांच्या पोषण आहारातही उंदीर सापडला आहे.
सध्याचा गतिमान सरकारच्या कामगिरीमुळे सर्वसामान्य जनता पूर्णपणे हवालदिल झाली आहे असे दिसत आहे. आपल्या सरकारचा निष्काळजी कारभारामुळे सरकार लोकांच्या जीवाशी सातत्याने खेळ करत आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या पोषण आहारासाठी आणलेल्या धान्यात भलामोठा सडलेला उंदीर निघाला आहे. असा निकृष्ट दर्जाचा आहार देऊन लहानग्यांच्या जीवाशी सरकारने खेळ चालवला आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी मंत्रालयात उंदरांनी हौदोस घालून अनेक फाईल कुरतडल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच गोरगरीब जनतेला वाटण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यातही काही दिवसांपूर्वी मेलेला उंदीर सापडला गेला होता. आता लहानग्यांच्या पोषण आहारात मेलेला उंदीर आढळल्याने सरकारच्या निष्काळजीपणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. हा प्रकार छत्रपती संभाजी नगर येथे घडली आहे. येथील अंगणवाडी शिध्यात मेलेला उंदीर सापडला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या कार्यकाळात, राज्यात उंदरांचा सुळसुळाट, असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने चागलेच मुद्दे उचलून धरले आहेत. आणि बोलण्यात ही आले आहे की, शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात उंदरांचा सुळसुळाट. त्यामुळे सरकार ने विचार करण्याची गरज आहे......Read more

Comments
Post a Comment