अहमदनगर जिल्हामध्ये कुस्त्यांचा थरार; प्रथमच विजेत्याला मिळणार सोन्याची गदा.
अहमदनगर :
आपल्या शहरात तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन होणार आहे कुस्त्यांचा विक्रम. आयोजक राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा २० ते २३ एप्रिल रोजी नगर शहरातील वाडियापार्क मैदानावर होणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्ष व अहमदनगर जिल्हा तालीम संघा मार्फत कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.
तरी सर्व नगरकरांसह आणि कुस्ती प्रेमींना या अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या मल्लास हॉलमार्क असलेली २४ कॅरेटची अर्धा किलो सोन्याची गदा (किंमत सुमारे ३५ लाख) जीएसटीच्या बिलासह बक्षीस स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी २१ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.
तरी या स्पर्धसाठी सर्व मल्लांना आमंत्रित केले गेले आहे. तसेच सर्व नगरकरांना व कुस्ती प्रेमींना ही निमंत्रित करण्यात आले आहे....Read more
Comments
Post a Comment