मंत्रालयात इंटरनेट सेवा बंद..... सर्व कामकाज ठप्प डिजीटल पाससेवा बंद.
मंत्रालयातील कामकाज अधिक अधिक ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अश्यातच आज ऑनलाईन मध्यवर्ती टपालचे उद्घाटन होत आहे. मात्र या उद्घाटन पूर्वच मंत्रालयातील इंटरनेट चा खोळंबा उडाला आहे.
काल दुपारी 3 वाजताचा सुमारास मंत्रालयातील इंटरनेट सेवा ही खोळंबली आणि त्या नंतर फक्त पासच नाही तर जी काही ऑनलाईन आणि डिजिटल स्वरुपात कामकाज चालते त्याचा देखील खोळंबा उडाला आहे.
आता बहुतांश कामकाज हे ऑनलाईन झालेले आहे. त्यामुळे आज मंत्रालयातील कुठले ही कामकाज होणार नाही. डिजिटल पासेस दिले जात होते ते आज हस्तलिखित स्वरुपात दिले जात आहेत. याच वेळेस आपले डिजिटल टपाल ची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री येत आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कामकाज वर आज प्रश्न चिन्ह उपस्थितीत होताना दिसत आहेत....Read more

Comments
Post a Comment