अहमदनगर उड्डाणपूलावरून पडून युवक गंभीर जखमी.
अहमदनगर उड्डाणपुलावर आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार युवक उड्डाणपुलावरून खाली पडला. हा युवक छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाण्यासाठी निघाला होता.
दुचाकीस्वार उड्डाणपुलावरील SBI चौक ते चांदणी चौकादरम्यान असलेल्या वळणावर आला असता त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो उड्डाणपुलावरून खाली पडला, त्याची दुचाकी मात्र उड्डाणपुलावरच राहिली. उड्डाणपुलावरून खाली पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे
त्याला उपस्थित तेथील नागरिकांनी उपचारासाठी त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल केले. या तरुणाच्या दुचाकीचा वेग ताशी 100 असावा, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.
•
Comments
Post a Comment