मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती आर. डी. धनुका यांची नियुक्ती.
मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती आर. डी. धनुका यांची नियुक्ती झाली आहे. सर्वेच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने बुधवारी न्यायमूर्ती धनुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली. तसेच सध्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असलेले न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वेच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने ही शिफारस केली. न्यायमूर्ती धनुका यांनी मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केले. १९८५ मध्ये त्यांनी एलएलबी पूर्ण केले आणि त्यांचे वडिल असलेले व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डी. आर. धनुका यांच्या चेंबरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर १९९० मध्ये त्यांना न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली....Read more

Comments
Post a Comment