😱महिला पोलीस अधिकारी मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ.
महिला पोलीस अधिकारी मृत अवस्थेत राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे कुर्ल्यातील कामगार नगरच्या शरद सोसायटीमध्ये ही महिला पोलीस अधिकारी वास्तव्यास होती.
शितल एडके असे मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. सदर पोलीस अधिकारी सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याकारणाने शेजारील राहणाऱ्यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला कळवली. पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता शितल एडके या मृत अवस्थेत आढळल्या.
त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याची प्राथमिक माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली आहे. त्यांचा मृत्यू चार ते पाच दिवस आधीच झाला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कुर्ल्यातील नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. एक वर्षापेक्षा अधिक काळ ड्युटीवर नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली होती. सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून त्यांच्या मृत्यू मागे काही इतर देखील कारणे आहेत का याचाही शोध घेत आहेत......Read more
Comments
Post a Comment